Latest NewsMaharashtra
राज्यात पुन्हा पावसाची हजेरी? पुढील आठवड्यात परतीचा मान्सून दाखल

पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेला ब्रेक आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाची हजेरी लागणार आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पुढील दोन दिवस कोकण-गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलासा देणारी माहिती दिली आहे की १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान परतीचा मान्सून सुरू होणार असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण खरीप पिकांना जीवदान देणारा हा पाऊस ठरणार आहे.



