Latest NewsMaharashtra

बारामतीत कौटुंबिक वादातून पुतण्याचा खून! बाथरूमच्या वादातून बाप-लेकाकडून बेदम मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

बारामती : बारामती तालुक्यातील पारवडी गावात बुधवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा केवळ बाथरूमच्या वादातून जीव गमवावा लागला आहे. चुलत्याने आणि त्यांच्या मुलाने मिळून पुतण्यावर प्राणघातक हल्ला करत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

ही घटना पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवार, 10 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता घडली. मृत युवकाचे नाव सौरभ विष्णू इंगळे (वय 24) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि त्याचा मुलगा रामचंद्र जगन्नाथ इंगळे या बाप-लेकाला अटक केली आहे.

काय घडले नेमके?

सौरभ इंगळे याने आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम का बांधले गेले, याबाबत आपल्या चुलत्यांना जाब विचारला होता. यावरून वाद वाढत गेला आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन, प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांनी सौरभला बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत सौरभला त्याच्या भावांनी बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, सौरभला मारहाण केल्यानंतर आरोपी बाप-लेक स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले आणि उलट सौरभविरोधातच तक्रार दाखल करून गेले. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सौरभने पोलिसांना मारहाणीची माहिती दिली होती. नंतर प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांचा तात्काळ तपास

घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गावात खळबळ

या हत्याकांडामुळे पारवडी गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ मालमत्तेच्या वादातून इतकी टोकाची कृती केल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button