Latest NewsMaharashtra

पुण्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस – दीड वर्षांत 40 हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी

पुणे – शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड वर्षांत तब्बल ४० हजारांहून अधिक नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती महापालिकेकडून समोर आली आहे.

दररोज शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तक्रारी येत आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणारे नागरिक या हल्ल्याचे जास्त बळी ठरत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

महापालिकेने लवकरच कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलने करण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button