Latest NewsMaharashtra
अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर ढगफुटीसारखी परिस्थिती

अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला असून तलावातील पाणी ओसंडून वाहू लागल्याने वागदारी परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे वागदारी (महाराष्ट्र) व हिरोळी (कर्नाटक) भागातील नद्या-नाले धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत. वाढत्या पाण्यामुळे गावांचा संपर्क मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सीमाभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



