ओबीसी नेते लक्ष्मण हाके अडचणीत; पोलिसांत दाखल झाली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीकडून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासन निर्णय मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवण्यात आल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयानंतर ओबीसी नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, जागोजागी आंदोलनं सुरू आहेत.
दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे प्रा. लक्ष्मण हाके यांनी शासनाचा अध्यादेश फाडल्यामुळे वातावरण तापले आहे. त्यांच्या या कृतीवरून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याने हाके यांच्यावर संविधानाचा अवमान केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की, हाके यांचे वक्तव्य आणि कृतीमुळे मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो



