Accident NewsLatest Newsmelghat

चिखलदऱ्यात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला

मेळघाट हा भाग जंगलांनी वेढलेला आहे. येथे वाघ, अस्वल, बिबटे यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही महिन्यांपासून मेळघाटात वन्य जीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून स्थानिक आदिवासींमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

ताजी घटना घडली आहे चिखलदरा तालुक्यातील घाना गावातील एक शेतकरी शेतात काम करत असताना अचानक अस्वल त्याच्यावर तुटून पडलं. काही क्षणांतच अस्वलाने शेतकऱ्याला गंभीर जखमी केलं. मात्र तेवढ्यात शेतातील गायी आणि बैलांनी मोठा आवाज करत आणि शिंगांनी हल्ला चढवत अस्वलाला पळवून लावलं. त्यामुळे शेतकऱ्याचा जीव थोडक्यात वाचला.

या घटनेनंतर जखमी शेतकऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button