AmravatiLatest News

डस्टबिन नसल्यामुळे ५ विक्रेत्यांकडून ३०००/- रुपये दंड; १० जणांना नोटीस

अमरावती : अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प प्रभाग क्रमांक ३ नवसारी परिसरात कठोरा नाका ते नवसारी रोड या भागातील विविध आस्थापना धारक व भाजी, फळ विक्रेत्यांकडे स्वच्छतेबाबत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
तपासणीदरम्यान आढळून आले की अनेक फळ व भाजी विक्रेत्यांकडे तसेच काही दुकानदारांकडे डस्टबिनची व्यवस्था नव्हती. या प्रकरणी एकूण ३ हातगाडीधारक आणि २ आस्थापना धारकांकडून प्रत्येकी ५००/- रुपये प्रमाणे एकूण ३०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १० विक्रेत्यांना नोटीसही बजावण्यात आली
.
ही तपासणी स्वास्थ निरीक्षक विनोद टांक आणि आय. ए. खान यांच्या उपस्थितीत पार पडली. महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वच्छता नियमांचे पालन करावे, दुकाने आणि विक्री ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था अनिवार्यपणे ठेवावी, तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button