Latest News

तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.
देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे.
मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होणार असली तरी, 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत भाविकांना देवीचं फक्त मुखदर्शन घेता येणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
5/7
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मामंदिर संवर्धन करत असताना भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे असल्याची माहिती देत यापूर्वी संभाजीराजेंनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, आता पुरातत्व विभागाकडून पुन्हा काम सुरू करण्यात येत आहे.र्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पुढील 10 दिवस भाविकांना मुखदर्शनच घेता येईल.
दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचं काम होत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटलं होतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button