विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागातील एम.ए. काऊन्सलिंग व सायकोथेरपी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाव्दारे चालविल्या जाणा-या एम.ए. काऊन्सलिंग व सायकोथेरपी या अभ्यासक्रमातून विद्याथ्र्यांना समाजजीवनातील घटनांची जाणीव होऊन त्यांना भविष्यात मोठी उपलब्धी होणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेवून विद्याथ्र्यांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे. सध्याच्या परिस्थितीत आणि स्पर्धेच्या युगात विद्याथ्र्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटणे साहजिकच आहे. मात्र त्यातून मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे देखील स्वाभाविक आहे. असेच अनेक प्रश्न आज समाजासमोर उभे आहेत. परंतु आजीवन अध्ययन व विस्तार विभागाव्दारे चालविल्या जाणा-या एम.ए. काऊन्सलिंग व सायकोथेरपी या अभ्यासक्रमातून विद्याथ्र्यांना समाजजीवनाचे आकलन होवून आपले भविष्य सुध्दा घडविता येते.
समुपदेशनाच्या माध्यमातून समस्यांवर मात
समाजामध्ये अनेक समस्येने अबालवृध्द ग्रस्त आहेत. त्यातून सततचा ताण, चिडचिड, त्यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होतात. अशा प्रसंगी समुपदेशनाच्या माध्यमातून त्यावर मात करता येते.
मानसशास्त्राची ओळख
एम.ए. काऊन्सलिंग व सायकोथेरपी या अभ्यासक्रमांतर्गत चार सेमिस्टरमध्ये मानसशास्त्राची ओळख, अपसामान्यांचे वर्तन, परिवर्तन, व्यक्तिमत्व विकास, संशोधन प्रक्रिया, ओळख व चिकित्सा, विविध उपचार पध्दती यांचे प्रात्याक्षिकासह तसेच प्रकल्प भेटी देवून विद्याथ्र्यांना प्रशिक्षित केले जाते. त्यामुळे प्रगत ज्ञान व कौशल्य मिळवून विद्यार्थी रोजगार मिळवू शकतात.
अभ्यासक्रमासाठी पात्रता
अभ्यासक्रमाला प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्याथ्र्यांनी कोणत्याही विद्या शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. वयाची कोणतीही अट नाही.
प्रवेश प्रक्रिया व संपर्क
एम.ए. काऊन्सलिंग व सायकोथेरपी या अभ्यासक्रमासाठी सत्र 2025-26 साठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्याथ्र्यांनी https://sgbauadm.edu.in/index.php/registration/user/register या लिंकवर जावून आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन समन्वयक डॉ. मंजुषा बारबुध्दे यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. मंजुषा बारबुध्दे मो. 8805090599, प्रा. जुबेर खान मो. 967315285, प्रा. शिवाणी अग्रवाल मो. 9423338761, प्रा. अर्चना ढोरे मो. 9373712689, प्रा. सुरेश रहाटे मो. 9421820416 व प्रा. प्रियंका तायडे मो. 9146951536 यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे.



