AmravatiLatest News

मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे अमरावती विमानतळावर आगमन

अमरावती: भारताचे मा. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी ४ वाजता बेलोरा येथील अमरावती विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार बळवंत वानखेडे, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा समावेश होता.

विमानतळावर स्वागत झाल्यानंतर श्री. न्यायमूर्ती गवई त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button