AmravatiLatest News

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत महा रक्तदान शिबिर: ५५ बॉटल्स रक्त संकलन

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने गाडगेबाबा मंडळात एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ५५ बॉटल्स रक्ताचे संकलन करण्यात आले, ज्यामुळे गरजू रुग्णांना मोठा हातभार लागणार आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, सुनील काळे, सचिन रासने, ललित समंदुरकर, प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष अभिजीत वानखेडे, किरणताई महल्ले, महामंत्री अमोल आगरकर, आकाश वानखेडे, नगरसेविका सौ. सुरेखा लुंगारे, वंदना मडगे, रीता मोकलकर, चंदूभाऊ भोमरे यांचा समावेश होता. तसेच, सविता ठाकरे, संगीता तोंडे, देवयानी कुटे, अनिता खडतकर, विनोद तांडवाईस, सुरेश गवई, राजूभाऊ जवंजाळ, श्याम पाध्ये, विशाल डहाके, अरुण मोरे, अनुप देशमुख, आकाश जाधव, राजेंद्र जवंजाळ, विद्या देशमुख, संतोष मांडवकर, वैशाली अरोकार, शुभम वाडेकर, पियुष पाटील, निलेश खंडारे, तुलसीदास माने, दीपक कविटकर, मोहन वाकोडे, स्वप्निल भोजने, वैभव देहंकर, योगेंद्र दहातोंडे, दादा सतीश मोकलकर, शुभम वरेकर, विजय ठाकरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्त संकलनाचे कार्य इर्विन रक्त संकलन समितीच्या टीमने केले. मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत भाजपने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे सामाजिक जाणीव आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button