Latest NewsNagpur

नागपुरात सरकारी ओबीसी मुलींच्या वसतिगृहात विनयभंग; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : नागपुरातील एका सरकारी ओबीसी मुलींच्या वसतिगृहात दोन आरोपींनी शिरून एका मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ जुलै रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, आरोपींनी दाराची कुंडी काढून वसतिगृहात प्रवेश केला होता. या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही नाही.

या वसतिगृहात एकूण ६४ मुली राहतात. घटनेच्या रात्री दोन आरोपी आत शिरले आणि त्यांनी एका मुलीचा विनयभंग केला. तसेच, तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

सरकारी वसतिगृहातच अशा प्रकारे घुसखोरी होऊन मुलींचा विनयभंग झाल्याने पालक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना अटक करावी आणि वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button