AmravatiLatest News

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा; महापालिकेची धडक मोहीम

अमरावती : अमरावती शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. पाहता पाहता अतिक्रमणे जमीनदोस्त होऊ लागली आहेत. काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून दिनांक ०९ जुलै,२०२५ रोजी, मा.आयुक्त, यांच्या निर्देशांवर जे.सी.पी द्वारे सकाळी,इतवारा बाजारा मधील सब्जी मार्केट, मटन मार्केट, परिसर, व दुपारी, ४.०० ते रात्री,७.०० वा.पर्यंत राजकमल चौक ते गांधी चौक, ते अंबागेट रोड पर्यंत परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. तसेच इतवारा बाजार,सब्जी मार्केटमध्ये काही दुकानदारांकडे डस्टबिन नसल्यामुळे त्यांना दंड सुद्धा देण्यात आला आहे,जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा माननीय आयुक्त, यांनी दिलेला आहे, या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून मुख्य शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे माननीय,आयुक्त यांनी सांगितले.
नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टींचा विचार करुनच महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करून अतिक्रमणे काढून घेत आहे.

सदर कार्यवाहीत अतिक्रमण पथक प्रमुख श्री. योगेश कोल्हे, संदीप सोनोने, अन्सार अहमद, शुभम पांडे, स्वास्थ, निरीक्षक सचिन सैनी, पोलीस निरीक्षक, सुरेश हीरुळकर,अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button