AmravatiLatest News

डॉ. सुशीला मालपाणी “निमा चिकित्सा रत्न पुरस्कार–2025” ने सन्मानित-निमा अमरावती शाखेच्या वतीने गौरवाचा क्षण..

अमरावती : निमा अमरावती शाखेच्या वतीने कालच्या सीएमइ कार्यक्रमात ज्येष्ठ चिकित्सा तज्ञ् डॉ. सुशीला मालपाणी यांना “निमा चिकित्सा रत्न पुरस्कार–2025” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष व निमा अमरावतीचे मार्गदर्शक डॉ. दिनेश गवळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे होते. या प्रसंगी मंचावर निमा राष्ट्रीय सहसचिव डॉ. विजय अजमिरे, निमा अमरावतीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण औगड, सचिव डॉ. पंकज कावरे, सह-समन्वयक डॉ कमल राऊत, निमा उमन्स फोरम अध्यक्षा डॉ. प्रेमा चौधरी, निमाआयुर्वेद फोरम अध्यक्ष डॉ. उन्मेश डालके आदी मान्यवर उपस्थित होते.

निमा अध्यक्ष डॉ. प्रवीण औगड यांनी सांगितले की,
“ही गौरवमयी निवड त्यांच्या वैद्यकीय सेवाभावना, कार्यातील सातत्य आणि समाजासाठी दिलेल्या भरीव योगदानाची जाणीव आहे. त्या आजही अमरावती स्त्रीरोग संघटनेच्या सक्रिय सदस्य असून, समाजसेविका व आदर्श वैद्यकीय सेविका म्हणून त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे…”
सत्काराला उत्तर देताना डॉ. मालपाणी यांनी 1970 पासूनच्या वैद्यकीय सेवेचा भावनिक आणि प्रेरणादायी आढावा सादर केला. पेशंटचा डॉक्टरवर असलेला विश्वास, रुग्णांविषयीची आपुलकी, निस्वार्थी सेवा, आणि स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्यांनी पार पाडलेली भूमिका त्यांनी मनोगतात मांडली.
त्यांनी जवळपास 1000 हून अधिक नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीरित्या केल्या असून, त्या काळात श्रीरोग तज्ञ म्हणून त्यांची भूमिका अत्यंत विश्वासार्ह ठरली. त्या निमा अमरावतीच्या सुरुवातीच्या निवडक सदस्यांपैकी एक आहेत. राजकमल चौक व भाजीबाजार परिसरात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू करून शेकडो महिलांना आरोग्यसेवा पुरवली. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव प्रॅक्टिस थांबवली असली तरी “त्यांचा वैद्यकीय वारसा अजूनही अमरावतीच्या मनात सजीव आहे.”

त्यांचे वडील स्वर्गीय श्री शरदचंद्र मालपाणी हे स्वातंत्र्यसैनिक होते, आणि समाजसेवेचा वारसा त्यांनीही आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जपला. त्यांना पूर्वीही अनेक सन्मान प्राप्त झाले असून, जेसीआय क्लासिक तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दिलेला पुरस्कार, तसेच 2008 मध्ये निमा अमरावती तर्फे मिळालेला सन्मान विशेष उल्लेखनीय आहे.

कार्यक्रमाचे संचालन डॉ अनुपमा काळे यांनी केले, सत्कारमूर्तींचा परिचय डॉक्टर सुषमा रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ राहुल भटकर यांनी केले.

कार्यक्रमाला डॉ दिनेश गवळी, डॉ अनिल बाजारे, डॉ राजेश उताणे, डॉ विजय घाटोळे, डॉ. दिपक पोच्छी, डॉ. सुनिल लांडे, डॉ. राजकुमार लंगडे, डॉ. अजय डकरे, डॉ. विवेक देशमुख, डॉ. राम खरबडे, डॉ. अमर बोडखे, डॉ. स्वाती टोंगळे, डॉ. उर्मिला वर्मा, डॉ. अर्चना केचे, डॉ. भावना उताणे, डॉ. वंदना कोरडे, डॉ. संजय फुलाडी, डॉ. शरद भोयर, डॉ. यु. बी. देशमुख, डॉ. शरद देशमुख, डॉ. उज्वल बारंगे, डॉ. अमोल ठवली, डॉ. विनोद रोडे, डॉ. अनिल बाजारे, डॉ. नंदकुमार जाधव, डॉ. दिनेश पाचपोर, डॉ. रंजना बनारसे, डॉ. विनोद मेत्रे, डॉ. विजय कळंबे, डॉ. मिलिंद उदापूरे, डॉ. विनोद फुसे, सौ. ज्योती रोडे, डॉ. विजय खंडारे, डॉ. नितीन भागवत, डॉ. उर्मिला वर्मा, डॉ. अर्चना केचे, डॉ. भावना उताणे, डॉ. वंदना कोरडे, डॉ. शरयू वानखडे, डॉ. अंकुश वाकोडे, डॉ. दिपक करवा, डॉ. स्वप्नील लद्धा, डॉ. सागर साम्बे, डॉ. रवींद्र डोंगरे, डॉ. सौ. स्वाती बमनोटे, डॉ. निलीमा उमप, डॉ. मंगेश कोल्हटकर, डॉ. नितीन ढोक, डॉ. रुपेश काळे, डॉ. सुनिल यादव, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. धनंजय साऊरकर, डॉ. विक्रांत गंधे, डॉ. राहुल माहुले, डॉ. प्रफुल्ल वऱ्हाडे, डॉ. अंकुश वाकोडे, डॉ. सौ. सुष्मा रामटेके, डॉ. प्रिती केडिया, डॉ. भावना उताने, डॉ. शारदा खांडे, डॉ. सुषमा देशमुख, डॉ. आशिष येवतीकर, डॉ. आकाश चांगोले, डॉ. सौ. वर्षा रोडे, डॉ. वैशाली बारंगे, डॉ. मंगेश भोंगाडे, डॉ. सचिन बगडे, डॉ. प्रांजली उमप, डॉ. दीपक करवा, डॉ. अमित गुल्हाने, डॉ. दिनेश वर्मा, डॉ. उर्मिला वर्मा, डॉ. अंकुश वाकोडे आदि बरेच सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button