AmravatiLatest News

“अमरावतीतील खासगी रुग्णालयांसाठी सुवर्णसंधी: महात्मा फुले व आयुष्मान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा!”

अमरावती : शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांसाठी आनंदाची बातमी. आता प्रत्येक इच्छुक पात्र मल्टि स्पेशिअलिटी/ सुपर स्पेशिअलिटी/ सिंगल स्पेशिअलिटी (बालरोग , नेत्ररोग रुग्णालय, ऑर्थोपेडिक्स, ओंकोलॉजी, बर्न, नेफ्रोलॉजि रुग्णालय, ई एन टी, बालरोग शस्त्रक्रिया) रुग्णालयांना आता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना मध्ये अंगीकृत केले जावु शकते.

सदर योजनेच्या निकषासाठी WWW.JEEVANDAYEE.GOV.IN या संकेत स्थळावर योजनेची संपूर्ण माहिती दिलेली असून, या संकेत स्थळा मार्फत आपल्या रुग्णालयाचे योजनेत अंगीकरण करण्याकरिता ऑनलाईन फॉर्म भरणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी व जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव ए. म.ज्यो.फु.ज.आ.योजना व आयु भा.प्र.मं.ज.आ. योजना, अमरावती व वैद्यकिय आरोग्‍य अधिकारी महानगरपालिका अमरावती व जिल्हा समन्वयक ए.म.ज्यो.फु.ज. आ.योजना व आयु भा.प्र.मं.ज.आ. योजना, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा.(8275095802)

तसेच सद्य स्थितीत जिल्ह्यामध्ये एकूण ३८ पैकी १८ शासकीय व २० खाजगी रुग्णालये अंगीकृत आहेत, जिल्हा व शहर निहाय एकत्रीत जनगणने नुसार आणखी ४२ खाजगी रुग्णालय अंगीकृत करणे अपेक्षित आहेत, तरी जास्तीत जास्त अमरावती शहरातील खाजगी रुग्णालयांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मा.आयुक्‍त महानगरपालिका अमरावती व वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी महानगरपालिका, अमरावती व जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती, यांनी केले आहे.

टीप : योजनेमध्ये रुग्‍णालय समाविष्‍ट करण्याकरिता किमान खाटाची संख्या ( सिंगल स्पेशिअलिटी -: १०, मल्टि स्पेशिअलिटी -: ३०)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button