AmravatiLatest News

महानगरपालिका अतिक्रमण विभाग व समाज कल्याण विभागाद्वारे संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही

अमरावती : झोन क्रमांक ०१ अंतर्गत विलास नगर रोड ते शेगाव नाका चौक ते आशियाड चौक पर्यंत मुख्य रस्त्यावरील नागरिकांद्वारे सार्वजनिक फूटपाथ/नालीवरील सामाजिक न्याय विभाग असे नमूद असलेले गटई स्टॉल लोखंडी खोके, शासनाचे अटी शर्तीचे पालन न करता भाजीपाला,हॉटेल कॅन्टीन, टू व्हीलर वाहन दुरुस्ती गॅरेज, मास विक्री, पानठेले व काही ठिकाणी हुबेहूब डुप्लिकेट खोके लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत असल्यामुळे तातडीने सदर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मा.आयुक्त यांनी दिले.
मंगळवार, दिनांक ०१/०७/२०२५ रोजी दुपारी १२.३०ते दुपारी ४.००वाजेपर्यंत सदर अतिक्रमण जे.सी.बी. मशिनीद्वारे काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही मध्ये ०८ गटई स्टॉल जप्त करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मध्ये समाज कल्याणचे विभागाचे प्रतिनिधी, निरीक्षक ऋषिकेश तायडे,अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, शुभम पांडे, संदीप सोनवणे, ससनर विभागाचे जागा निरीक्षक, श्री भांडे,
पोलीस कर्मचारी श्री. सुरेश हिरुरकर , व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही नियमित सुरू राहील,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button