Latest News

मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा

मुंबई : मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या वतीने राज्यभरातील विज्ञानप्रेमींसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. परिषदेतर्फे इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या गटासाठी राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी “मोबाइलपासून मैदानाकडे” हा विषय तर खुल्या गटासाठी “देहदान आणि अवयवदान” असा निबंधाचा विषय निश्चित करण्यात आला आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या विषयांची मांडणी करणं अपेक्षित आहे.

निबंधाची शब्दमर्यादा १५०० ते २००० शब्दांपर्यंत असावी. तसेच, स्पर्धेत सहभाग विनामूल्य असून, इच्छुकांनी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आपले निबंध पाठवावेत, असे आवाहन विज्ञान परिषदेचे प्रवीण गुलहाने यांनी केले आहे.

निबंध पाठवताना स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता, वय, इयत्ता (शालेय गटासाठी), तसेच संपर्क क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. सर्वोत्कृष्ट निबंधांना प्रमाणपत्र आणि आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button