AmravatiLatest News

प्रभाग 20 सूतगिरणी (कुंभारवाडा) येथे मूर्तिकारांना 6500 रुपयांचा दंड आणि नोटीस – सहा. आयुक्त धनंजय शिंदे यांची कारवाई

अमरावती : दक्षिण झोन क्र. 4 बडनेरा येथील प्रभाग क्रमांक 20 (सूतगिरणी) अंतर्गत कुंभारवाडा परिसरात आज दि. 28 जून रोजी मा. सहायक आयुक्त धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी परिसरात कुंभार समाजातील काही मूर्तिकारांकडे वेस्ट मटेरियल तसेच अर्धवट मूर्ती साठवलेले आढळून आले.

या अनागोंदीमुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता, सहायक आयुक्त यांच्या सूचनेनुसार सर्व मूर्तिकारांना प्रकरण 14, नियम 5(1) व 5(2) अंतर्गत 6500 रुपये दंड आकारण्यात आला असून नोटीसाही देण्यात आल्या आहेत. तसेच डस्टबीन नसल्याच्या कारणावरूनही कारवाई करण्यात आली.

या कारवाईच्या वेळी स्वच्छता निरीक्षक शारदा गुल्हाने , स्वास्थ्य निरीक्षक अनिल गोहर, वैभव खरड, श्री. सावरकर, सौ. बैस, श्री. ढेडवाल, श्री. मेश्राम हे अधिकारीही उपस्थित होते.

शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन सातत्याने कार्यरत असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button