Latest NewsNanded

मनोज जरांगे पाटील यांची आमदार चिखलीकरांनी घेतली भेट

नांदेड : लोहा – कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवर सखोल चर्चा झाली.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले की, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर एकत्रितपणे दबाव टाकला पाहिजे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे आणि सर्व प्रतिनिधींनी भूमिका ठामपणे मांडली पाहिजे.

या बैठकीनंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,

“मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी पूर्ण ताकदीने सोबत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा – कंधार मतदारसंघाचे आमदार असून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button