Latest NewsWeather Report

महाराष्ट्रात आणखी 5 दिवस ‘कोसळधार’! कोकण, घाट माथ्यावर मान्सूनचा जोर वाढला, मुंबईत असं असेल हवामान?

Maharashtra Weather Update: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे तर घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पुढील पाच दिवस पावसाचे धुमशान असेच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.

मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशाचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूव परिस्थिती आहे. उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणिका रेषा स्थिर आहे. त्यामुळं पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील 5 दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील इतर भागात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईत सामानःत आकाश ढगाळ राहिल आणि उपनगरात मधूनमधून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

धरणक्षेत्रात पाऊस
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार बदलापूर जवळील एमआयडीसी बारवी धरण 43 टक्के भरले आहे. बारवी धरणात मागील वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा साठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आतापर्यंत भावी धरणात 789 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण 25 टक्के भरलं होतं मात्र आज बारावी धरणात 43% पाणीसाठा जमा झाला आहे. बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रासह , ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, अंबरनाथ ,बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा केला जातो अशाच प्रकारे बारवी धरणात पाऊस सुरू राहिला तर लवकरात बारवी धरण विक्रमी वेळेत होईल भरेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button