AkolaCrime News

अकोला: हॉर्न वाजवण्यावरून वाद विकोपाला; चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

अकोला : शहरातील मस्तान चौक परिसरात हॉर्न वाजवण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाने चिघळ घेत, त्याचे रूप थेट चाकूहल्ल्यात परिवर्तित झाले. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा घडली.

वादातून चाकूहल्ला; नागरिकांची गर्दी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने जोरात हॉर्न वाजवल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. क्षुल्लक कारणावरून वाद सुरु झाला आणि क्षणातच तो शिवीगाळीतून थेट चाकूहल्ल्यात परिवर्तित झाला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

रुग्णालयात मृत्यू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपीस ओळखण्यात आले असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस तपास यंत्रणा घटना गांभीर्याने तपासत आहे.

प्रतिनिधी : मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button