AkolaLatest News

पाऊस – शेतकऱ्यांसाठी वरदान की संकट? अकोला शहरात अवकाळी पावसाचा कहर

अकोला : अकोला शहरासह जिल्ह्यातील दानापूर, तेल्हारा, बालापुर, पातूर परिसरात आज (शनिवार, २५ मे) दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच धांदल उडाली असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

जमिनीत वाढली आर्द्रता, खरीपासाठी पोषक स्थिती
या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी ही परिस्थिती लाभदायक आहे. भात, मका, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या पूर्वतयारीसाठी अशा स्वरूपाचा पाऊस आवश्यक मानला जातो.

फळपिकांना धोका; शेतकऱ्यांची चिंता
मात्र, दुसरीकडे लिंबू, डाळिंब, पेरू आणि आंबा अशा काही फळपिकांसाठी हा अवकाळी पाऊस हानीकारक ठरू शकतो. फळझाडांवरील फळे गळून पडण्याची आणि बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

शहरात वाहतुकीवर परिणाम
अकोला शहरात जोरदार सरींचा अनुभव घेतला गेला असून, काही भागांत रस्ते जलमय झाले. विशेषतः रेल्वे स्टेशन रोड, माळीपूरा, जुना शहर भागात साचलेल्या पाण्यामुळे नागरिक व वाहनधारकांची गैरसोय झाली.

तापमानात घट
आजच्या पावसामुळे शहरात तापमानात कमालीची घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button