Social news

  • Amravati

    विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन व मानवाधिकार दिन उत्साहात

    श्रमदान उपक्रमातून विद्याथ्र्यांचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अमरावती (दि.11.12.2025) –  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन व…

    Read More »
  • Amravati

    अमरावतीत ‘अमृत’चे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

    अमरावती, दि. 10 : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी – अमृत’ आज अमरावतीत आपले विभागीय…

    Read More »
  • Amravati

    स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय३७) यांचे दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान

    मु. सावंगा (मेध), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय ३७) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चव्हाण परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चव्हाण परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चव्हाण परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात चव्हाण परिवारातील श्री. दशरथ चव्हाण, श्री. शामराव चव्हाण, श्री. प्रकाश सोळंके व चव्हाण परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

    Read More »
  • Amravati

    कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू

    अमरावती | जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय…

    Read More »
  • Amravati

    संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

    अमरावती | आज जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या आदरांजलीसह साजरी करण्यात आली. 🔹 कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी…

    Read More »
  • Latest News

    विश्वविद्यालय में महापरिनिर्वाण दिवस पर हुआ विशेष व्याख्यान

    सामाजिक जनतंत्र स्थापित करने में डॉ. आंबेडकर का महत्वपूर्ण योगदान : मंगेश दहीवले वर्धा, 08 दिसंबर 2025: महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में…

    Read More »
  • Amravati

    जगातील सर्वोत्तम संस्कृती भारतीय संस्कृती — मोनाली नरेंद्र बोबडे यांचे विचार विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारे

    विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे ’परदेशातील वास्तव्य’ या विषयावर आयोजित व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण, संस्कृती, जीवनशैली आणि रोजगाराच्या संधींबद्दल सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. एस. डी. वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रित मोनाली नरेंद्र बोबडे आणि निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय नीताताई बोबडे या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. डी. कायपेल्लीवार यांनी करताना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन सत्रांची गरज अधिक असल्याचे स्पष्ट केले. मोनाली ताई बोबडे यांनी आपल्या प्रभावी व आकर्षक व्याख्यानातून परदेशातील जीवनशैली, शैक्षणिक प्रणाली, सांस्कृतिक मूल्ये आणि रोजगाराच्या विविध संधी याचा विस्ताराने ऊहापोह केला. त्यांनी भारतातील संस्कृती ही जगातील सर्वोत्तम संस्कृती असून भारतीय मूल्ये, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी ही देशाची खरी ओळख असल्याचे अधोरेखित केले. परदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणप्रणाली, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी–मैत्रीपूर्ण वातावरण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी याबद्दल अत्यंत सोप्या व वास्तववादी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परदेशातील आव्हाने आणि संधी यांचा संतुलित आढावा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीचे योग्य नियोजन, आवश्यक कौशल्ये, भाषिक प्राविण्य, शैक्षणिक तयारी आणि व्हिसा प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता मिळाली. नीताताई बोबडे यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाशी असलेले नाते हे मानवी जीवनाचे खरे बळ असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही केवळ जबाबदारी नसून भविष्यासाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अर्चना कुलकर्णी यांनी करताना असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अशोक ढाले, प्रा. योगेश टापरे, प्रा. आदर्श जगताप, प्रा. श्वेता कदम, प्रा. पल्लवी खरात, डॉ. रोहिणी धरमकार, प्रा. धीरज मोहिते, प्रा. विनोद डाबरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यश मोरे यांनी सहकार्य केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जागतिक दृष्टीकोन, करिअर नियोजनाची जाणीव आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला. परदेशातील संधी आणि भारतीय मूल्यांची सांगड घालून योग्य दिशा निवडण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्याचे समाधान महाविद्यालयीन वर्तुळातून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासात मोलाची भर घालत एक स्मरणीय आणि प्रेरणादायी ठसा उमटवला. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • Jalna

    भोकरदन तालुक्यात व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर; ग्रामीण नागरिकांना मिळाली नैसर्गिक उपचार सेवा

    जालना, ४ डिसेंबर: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी एक भव्य विनामूल्य आरोग्य शिबिर…

    Read More »
  • Amravati

    साबनपुरा में तीन दिनों से कचरा नहीं उठा; बदबू से नागरिक परेशान, कंटेनर परिसर में लगी आग

    साबनपुरा क्षेत्र में पिछले तीन दिनों से कचरा न उठने के कारण बदबू फैल गई है और नागरिकों को भारी…

    Read More »
  • Latest News

    पिंपळगाव बु. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ७७वा पुण्यतिथी सप्ताह भक्तिभावात सुरू

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ७७व्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळगाव बु. येथे ‘संगीतमय ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताह’ मोठ्या भक्तीभावात सुरू आहे. श्री गुरुदेव सर्वधर्म स्मृती…

    Read More »
Back to top button