citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

कोंबिंग ऑपरेशनमध्ये सक्करदरा पोलिसांची मोठी कारवाई

रेकॉर्डवरील आरोपीकडून देशी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि तलवार जप्त; ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रेकॉर्डवरील आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवार आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सक्करदरा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सुदामपुरी भांडे प्लॉट चौक परिसरात सापळा रचला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रेमसिंग जितेंद्र बैस (वय २२) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (मॅगझीनसह), पाच जिवंत काडतुसे, एक लोखंडी तलवार आणि एक मोबाईल फोन असा एकूण सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैधरित्या अग्निशस्त्र आणि धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या मते, या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होते का, याचाही तपास सुरू आहे.

नागपूर पोलिसांच्या सातत्यपूर्ण कोंबिंग मोहिमेमुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत असून, अवैध शस्त्रसाठ्याविरोधातील कारवाई आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button