सिंधी समाजानं पीएम मोदींना पत्र देत मागितली अमित बघेलची अटक

रायपूर येथील अमित बघेल या व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधी समाजाविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याने भगवान झूलेलाल साईं आणि भगवान अग्रसेन यांचा अपमान केला तसेच सिंधी समाजाला “पाकिस्तानी सिंधी” म्हणत घोर अपमानजनक शब्द वापरले. या वक्तव्यामुळे देशभरातील सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देशभरातून अमित बघेलविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असूनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. याविरोधात सिंधी समाज आक्रमक होत त्यांनी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला, सिंधी समाजानं जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र सादर करत, अमित बघेलला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. समाजानं स्पष्ट केलं की सिंधी समाज नेहमीच शांततेत राहतो आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत असतो. परंतु देवतांचा अपमान करून राजकीय प्रसिद्धीसाठी घाणेरडी भाषा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी समाजाची ठाम भूमिका आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिंदी समाज बांधव उपस्थित होते.



