citynewsgold ratelatestnewss breakingnews

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर कोसळले; चांदी ५,५०० रुपयांनी, तर सोनं १,१०० रुपयांनी स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा भारतीय सराफा बाजारावर परिणाम; मुंबईत २४ कॅरेट सोनं १.३५ लाखांच्या पार, दिल्लीसह प्रमुख शहरांतील सोने-चांदीचे नवे दर जाणून घ्या

मुंबई : सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या किमतीत किलोमागे तब्बल ५ हजार ५०० रुपयांची, तर सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे सुमारे १ हजार १०० रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर खाली आले असून, या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यवहारांवर नजर टाकली असता, कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत ०.३३ टक्क्यांची घसरण होऊन दर ३ हजार ८७३.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचला. तर चांदीच्या दरात तब्बल ३.२७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, दर ४७.५१५ डॉलर प्रति औंस झाला आहे. जागतिक बाजारातील या घसरणीचा परिणाम देशांतर्गत वायदा बाजारातही दिसून आला.

देशांतर्गत वायदा बाजारात डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर सुमारे १ हजार १०० रुपयांनी घसरून १ लाख ३५ हजार ६८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. दुसरीकडे, चांदीच्या दरात किलोमागे ५ हजार ५०० रुपयांची घट होऊन तो १ लाख ७० हजार ७४७ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती?

सराफा बाजारातील उपलब्ध दरांनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे १ लाख ३६ हजार ३१० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २४ हजार ९५१ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २ हजार २३३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीचा भाव सुमारे १ लाख ७० हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दिल्ली-मुंबईसह प्रमुख शहरांतील सोने-चांदीचे दर

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर पाहता, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३५ हजार ७४० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा दर १ लाख ७० हजार रुपये प्रति किलो आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ३५ हजार ९७० रुपये मोजावे लागत असून, चांदीचा दर १ लाख ७१ हजार ७५० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला आहे.

पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३७ हजार ८०० रुपये, जयपूरमध्ये १ लाख ३६ हजार ७० रुपये, कानपूरमध्ये १ लाख ३७ हजार २०० रुपये, तर लखनऊमध्ये १ लाख ३५ हजार ४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे.

खरेदीपूर्वी स्थानिक बाजारातील दर तपासा!

दरम्यान, सोने-चांदीच्या दरातील घसरण पाहून ग्राहक खरेदीचा विचार करत असले, तरी शहरानुसार आणि स्थानिक सराफा बाजारानुसार किमतींमध्ये फरक असू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, रुपयाचे मूल्य आणि इतर बाजार घटकांचाही सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होत असतो. त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा व्यापाऱ्यांकडून ताजे दर तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच दागिन्यांच्या अंतिम किमतीत मेकिंग चार्जेस आणि लागू करांचा समावेश होतो. त्यामुळे केवळ सोन्याचा भाव पाहून खरेदीचा निर्णय न घेता अंतिम बिलाची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button