citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरच्या दवलामेटी परिसरात वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नमस्कार, आपण पाहत आहात आमचे विशेष वृत्तांकन.

नागपूरच्या दवलामेटी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचा घरात मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरात मृत अवस्थेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास वाडी पोलीस करत आहेत.

नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी माळा कॉलनी परिसरातील कॉटर क्रमांक ९१ येथे ही घटना उघडकीस आली. वृद्ध दाम्पत्य घरात मृत अवस्थेत असल्याची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवक मंगेश गमे तसेच त्यांची टीमही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घराची तपासणी करून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले.

मृतांची ओळख गंगाधर जानबाजी भोंगाडे (वय ७५) आणि कौशल्य गंगाधर भोंगाडे (वय ७५) अशी झाली आहे.

या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वृद्ध दाम्पत्याच्या निधनाने नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्ये स्पष्ट होणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button