City CrimeCrime NewsIndia NewsLatest News
मध्य प्रदेशात व्यापाऱ्याच्या घरावर गोळीबार; १० कोटींची खंडणी मागणी, बिश्नोई गँगचा दावा

मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात व्यापाऱ्याच्या घरावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ मार्च रोजी भिलगाव येथे, कसरावद पोलीस स्टेशन हद्दीत घडली. अज्ञात हल्लेखोरांनी व्यापारी दिलीप राठोड यांच्या घरावर गोळीबार केला.
यानंतर सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे.
घटनेनंतर व्यापाऱ्याच्या घराभोवती पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



