City CrimecitynewsCrime NewsNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; महिला गंभीर जखमी

नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गद्दी गोदाम परिसरातील मोहन नगर, लाल का बगीचा भागात ही थरारक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पठिनेश नावाच्या पतीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

महिलेच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीविरुद्ध ‘हत्या करण्याचा प्रयत्न’ (हाफ मर्डर) चा गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.


या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून वाढणाऱ्या अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button