नागपुरात हॉर्नच्या वादातून मारहाण; महाल परिसरात तणाव

नागपूरमधील महाल परिसरात किरकोळ कारणावरून मोठ्या हिंसाचाराला तोंड फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे… वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने येत मारहाण झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे…
ही घटना Nagpur शहरातील महाल परिसरातील इंद्रायणी साडी स्टोअरजवळ सोमवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र हा वाद हळूहळू वाढत गेला आणि दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले.
दोन्ही बाजूंनी आपल्या साथीदारांना बोलावण्यात आले आणि काही वेळातच परिस्थिती चिघळली. त्यानंतर या वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले.
या घटनेत Rishabh Singh आणि Pankaj Singh हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या मारहाणीमध्ये जुगनू नावाच्या तरुणाचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने Nagpur Police यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला आहे.
सध्या Kotwali Police Station येथे या प्रकरणाची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे.
किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे… नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे…



