Latest NewsSocial NewsYavatmal

यवतमाळात ‘महाराजस्व समाधान शिबीर’ला सुरुवात, हर्जुना येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ जिल्ह्यात आजपासून गावपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची सुरुवात करण्यात आली. यवतमाळ तालुक्यातील हर्जुना येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली समस्या ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. तसेच नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभही वितरित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि तहसिलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना देण्यात आले. या शिबिरात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसुली समस्या गावपातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button