गुगल गर्ल कोमलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका विद्यार्थिनीने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या दहा सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अचूकपणे सांगत या विद्यार्थिनीने India Book Of Records मध्ये आपले नाव नोंदवले आहे. या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील कोमल खानपटे हिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.
श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोमलने अवघ्या 10 सेकंदांच्या कालावधीत भारतातील सर्व राज्यांची नावे सलग आणि अचूकपणे सांगत हा विक्रम केला. तिच्या या अद्भुत कामगिरीची दखल घेत India Book Of Records कडून तिच्या नावाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या सन्मानाच्या निमित्ताने कोमलला प्रमाणपत्र, IBR पेन, बॅच आणि Medal Of Achievement देऊन गौरविण्यात आले. कोमलचे वडील देविदास खानपटे हे पत्रकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच कोमलला लहानपणापासून सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच कोमलने आज हा अभिमानास्पद विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात कोमलला “गुगल गर्ल” म्हणून ओळख मिळाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत असून ती अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अवघ्या दहा सेकंदात भारतातील सर्व राज्यांची नावे सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारी बुलढाण्याची ही “गुगल गर्ल” कोमल खानपटे आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.



