Latest NewsMaharashtraNashik

इगतपुरीतील वसतिगृहात धक्कादायक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांवर अत्याचार

इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीतील लहान विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या नावाखाली अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाणे येथे सात विधीसंघर्षित बालकांसह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वसतिगृहात खेड्यापाड्यांतील तसेच आदिवासी वस्त्यांमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. याच वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या नावाखाली धमकावत वसतिगृहापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे कॉटेजजवळील झाडाझुडपांच्या पडीक जागेत नेले. या एकांत ठिकाणाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या ठिकाणी कोणालाही संशय येणार नाही अशा एकांत जागेचा गैरफायदा घेत हा प्रकार काही काळ सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे विद्यार्थी सुरक्षा, वसतिगृहातील देखरेख आणि प्रशासनाच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button