AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत चाकूसह फिरणारा इसम गुन्हे शाखेच्या ताब्यात; संभाव्य गंभीर प्रकार टळला

अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य गंभीर प्रकार टळल्याची घटना समोर आली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान चाकू घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते. यावेळी जुना बायपास रोडवरील राहुल नगर गेटसमोर एक इसम हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे आरोपी अजहर खान जुरावर खान (वय ३६), रा. पठाण चौक, अमरावती हा हातात चाकू घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे १ हजार रुपये किमतीचा चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button