AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

Amravatiमध्ये रंगपंचमीदिवशी दगडफेक; पाच जण गंभीर जखमी

अमरावती, दि. ३ मार्च : रंगपंचमीच्या दिवशी शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Fraserpura Police Station हद्दीत महिलेकडून जाब विचारल्याच्या कारणावरून काही युवकांनी घरावर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारात पाच जण गंभीर जखमी झाले असून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवार, ३ मार्च रोजी रात्री फ्रेजरपुरा परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळ टवाळखोरी करत असलेल्या काही युवकांना संबंधित महिलेकडून जाब विचारण्यात आला. या घटनेचा राग मनात धरून काही युवकांनी संबंधितांच्या घरावर अचानक दगडफेक करत हल्ला चढवला.

या हल्ल्यात पंकज पाटील, मनोज पाटील, सविता पाटील, यश पाटील आणि सुमित चव्हाण हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या या प्रकरणाचा तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रंगपंचमीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button