AmravatiLatest NewsSports

अ.भा. आंतर विद्यापीठ जिम्नॅस्टिक (महिला व पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 04.03.2026) – पंजाब युनिव्र्हसिटी, चंदिगड येथे होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जिम्नॅस्टिक (महिला व पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.

महिला संघ   

         महिला संघाच्या स्पर्धा दि. 14 ते 16 मार्च दरम्यान होणार असून चमूंमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. क्रिष्णा भट्टड, कु. सुखदा हंबर्डे व कु. राधिका मानकर हिचा समावेश आहे.

पुरूष संघ 

             पुरूष संघाच्या स्पर्धा दि. 18 ते 20 मार्च दरम्यान होणार असून चमूंमध्ये शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचा पियुष चौधरी, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा आदित्य श्रीवास, आदित्य चोंढे व साहील दमाये, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा सुमित नांदणे, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराचा प्रथमेश लोखंडे याचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे 05 ते 15 मार्च, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button