विद्यापीठाचे चिखलदरा येथे 7 ते 11 मार्च दरम्यान राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबीर

अमरावती (दि. 02.03.2026) : – महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दि. 7 ते 11 मार्च दरम्यान राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराचे आयोजन चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन 8 मार्च रोजी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामदास पोकळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय, मुंबई येथील राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलींद काळे, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, व रा.से.यो. क्षेत्रीय संचालनालय, पुणे येथील क्षेत्रीय संचालक डॉ. अजय शिंदे, वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथील संचालक कु. मुक्ताबाई टेकाळे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदराचे प्राचार्य डॉ. राजेश जयपुरकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर उपस्थित राहणार आहे.
समारोप
समारोप व बक्षिस वितरण सोहळा 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथील संचालक कु. मुक्ताबाई टेकाळे, मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री अनंता दिगोळे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदराचे प्राचार्य डॉ. राजेश जयपुरकर, चिखलदरा येथील वन परिक्षेत्र अधिकारी श्री राघवेंद्र मुन उपस्थित राहणार आहेत.
विद्याथ्र्यांनी बडनेरा रेल्वे स्थानक ते वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा पर्यंत तसेच अमरावती रेल्वे स्थानक ते वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा पर्यंत पोहचण्यासाठी निमंत्रण पत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, रासेयो संचालक डॉ. निलेश कडू, जिल्हा समन्वयक डॉ. विशाल गजभिये, डॉ. विकास देशमुख, अकोला जिल्हा समन्वयक डॉ. सुधीर कोहचाळे, बुलडाणा जिल्हा समन्वयक डॉ. हनुमंत भोसले, यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ. निलिमा दवणे, वाशिम जिल्हा समन्वयक डॉ. अशोक वाघ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रासेयो संचालक डॉ. निलेश कडू यांच्याशी प्रत्यक्ष वा दूरध्वनी क्रमांक 9421821679 वर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



