International NewsLatest NewsSocial News

इस्रायल–इराण युद्धाची झळ दुबईपर्यंत; बुर्ज खलिफा परिसरात ड्रोन हल्ला, विमानसेवा ठप्प

दुबई/नवी दिल्ली : इस्रायल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील परिस्थिती झपाट्याने बिघडत असून त्याचे परिणाम दुबईपासून भारतापर्यंत दिसून येत आहेत. दुबईतील जगप्रसिद्ध इमारत Burj Khalifa परिसरात ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बुर्ज खलिफा तात्काळ रिकामी करण्यात आली असून इमारतीवरील रोषणाई बंद करण्यात आली. हल्ल्यानंतर Dubai International Airport आणि Al Maktoum International Airport येथे पुढील आदेशापर्यंत उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत.

दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक देशांनी तात्पुरते आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे.

Air India ने १ मार्च रोजी लंडन, टोरंटो, फ्रँकफर्ट, पॅरिस आणि शिकागो या मार्गांवरील सर्व नियोजित उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना विमानतळावर येऊ नये तसेच संबंधित एअरलाईन्सकडून ताज्या माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच Directorate General of Civil Aviation (DGCA) ने भारतीय विमान कंपन्यांना ११ देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.

सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. प्रशासन आणि विमान कंपन्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button