agricultureLatest NewsMaharashtraYavatmal

कापूस विक्रीविना शिल्लक; शेतकरी अडचणीत

यवतमाळ : महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळ (CCI) ने जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रे २७ फेब्रुवारी २०२६ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे तसेच तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्रीविना शिल्लक आहे. सीसीआयची खरेदी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

सीसीआय केंद्रे बंद होताच काही व्यापाऱ्यांनी कापसाचे दर आणखी कमी केल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अनेक शेतकरी अजूनही कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांनी सरकारकडे खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button