Latest NewsMaharashtra

जयंतीनिमित्त भव्य पांढरा-भगवा-निळा एकता मिरवणूक; सर्वधर्मसमभावाचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य, दिव्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी पांढरा-भगवा-निळा एकता मिरवणूक उत्साहात पार पडली. मैत्री संघटना, युवा गोर बंजारा समिती आणि निलेश जाधव मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मिरवणुकीत शेकडो समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

शेगाव नाका येथून पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि माँ जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून महाआरती करण्यात आली. “जय सेवालाल… जय शिवराय… जय भीम…” च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरल्या त्या भव्य आणि देखण्या झांक्या. धर्मवीर संभाजी महाराज, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर आधारित सजीव देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी बंजारा समाजाचे महंत, पोहरादेवीचे धर्मगुरु जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील राणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीचा समारोप दस्तुर नगर येथील मंगलधाम – संत सेवालाल महाराज सार्वजनिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

सामाजिक ऐक्य, परंपरा आणि इतिहासाचा अभिमान यांचा संगम असलेली ही भव्य एकता मिरवणूक शहरासाठी प्रेरणादायी ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि संत सेवालाल महाराजांच्या मानवतेच्या संदेशाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button