विद्यापीठात चित्रकला व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

अमरावती (दि. 24.02.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विद्याथ्र्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या उपक्रमाला विद्याथ्र्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना त्यांच्या कल्पकता आणि कलात्मक अभिव्यक्तीला वाव मिळाला. विविध सामाजिक, पर्यावरणीय, राष्ट्रीय तसेच सांस्कृतिक विषयांवर आधारितचित्रे आणि आकर्षक रांगोळ्यांमधून विद्याथ्र्यांनी आपली कलात्मक दृष्टी प्रभावीपणे सादर केली. स्पर्धेत सहभागी विद्याथ्र्यांनी रंगसंगती, मांडणी आणि संदेशात्मकतेचा उत्कृष्ट संगम साधत आपले कौशल्य दाखविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली गुडधे होत्या. . कार्यक्रमाचे उद्घाटन शशिकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. प्रेमानंद तिडके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. श्रावस्ती सर आणि प्रा. बुरंगे सर यांनी केले. प्रत्येक कलाकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करून कल्पकता, सादरीकरण, विषयाची सुसंगती आणि सौंदर्यदृष्टी यांचा विचार करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.
अध्यक्षीय भाषणातून विद्याथ्र्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा स्पर्धांमुळे विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत डॉ. वैशाली गुडधे यांनी व्यक्त केले मान्यवरांनी विद्याथ्र्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत उपक्रमांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ढोरे मॅडम यांनी, तर आभार डॉ. श्रीकांत पाटील यांनी मानले.
स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांना आपल्या कलात्मक क्षमतांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्याथ्र्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला निश्चितच चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



