अ.भा. आंतर विद्यापीठ कुस्ती (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 24.02.2026) – कुरूक्षेत्र युनिव्र्हसिटी, कुरूक्षेत्र येथे 17 ते 20 मार्च, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये मातोश्री एस.एम. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाईची कु. जिगिशा दवणे व कु. जानव्ही जवणे, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाची कु. कविता राठोड व कु. भारती टेकाडे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रेरणा अरुडकर व कु. गौरी धोटे, एस.एस.एस.के.आर. इन्नानी महाविद्यालय, कारंजा लाडची कु. उर्जिता नेटके, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. अ·िानी दहिकर, आर.ए. महाविद्यालय, वाशिमची कु. आराधना नाईक, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. जस्मित कौर राहल, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. प्राची जेधे व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. तन्नू कुमारी हिचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे 05 ते 14 मार्च, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



