AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत मंदिरातील चोरी उघड; राजापेठ पोलिसांची काही तासांत कारवाई, आरोपी अटकेत

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावती शहरातील राजापेठ परिसरात मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघड करत राजापेठ पोलीस ठाणे यांनी आरोपीला अटक केली आहे. चोरीला गेलेला चांदीचा मुकुट आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

राजापेठ परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हनुमानजींचे छोटे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावर बसविण्यात आलेला सुमारे २५० ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे ४० हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली.

फिर्यादी पवन रंगराव भेरडे यांच्या पत्नीने मुकुट दिसत नसल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता मुकुट चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासाची सूत्रे हाती घेत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगेश प्रकाश चवरे (वय ३८ वर्षे, रा. बेनोडा, अमरावती) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


राजापेठ पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button