AmravatiLatest NewsSocial News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

अमरावती – (दि. 20.02.2026) मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मोठ¬ा उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.



