Amaravti GraminLatest NewsMaharashtraSocial News

धारणी तालुका : सीईओ संजिता मोहपात्र यांचा दौरा; जनसंवादातून नागरिकांच्या समस्या ऐकल्या

धारणी तालुक्यात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी विविध गावांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. धारणी तहसील कार्यालय येथे जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार प्रदीप शेवाळे, ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, कार्यकारी अभियंता जाधव, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी व समस्या मांडल्या. सीईओ मोहपात्र यांनी त्या काळजीपूर्वक ऐकून संबंधित विभागांना तातडीने निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या.

मोगर्दा गावात विकासकामांची पाहणी

यानंतर मोगर्दा गावात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. गावातील संगणकीकृत वाचनालय, डिजिटल अंगणवाडी, डिजिटल जिल्हा परिषद शाळा, अपंगांसाठी ५ टक्के निधी वाटप, महिला व बालकल्याणासाठी १५ टक्के निधी तसेच मुलींना सायकल वाटप या उपक्रमांची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली.

याशिवाय ग्रामपंचायतीचा कर नियमित भरणाऱ्या नागरिकांना वर्षभर मोफत चक्की आटा देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

या कार्यक्रमाला सरपंच गोपाळ ढोल्या दुर्वे, उपसरपंच शालिग्राम दहीकर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button