AmravatiSocial News

अमरावती : सिपना महाविद्यालय परिवारातर्फे शिवजयंती उत्साहात; भव्य बाईक रॅलीने शहर दणाणले

अमरावती शहरात शिवजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. सिपना महाविद्यालय परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भव्य बाईक रॅली, ढोल-ताशांचा गजर आणि विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाने वातावरण शिवमय झाले होते.

गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे हातात घेऊन आणि घोषणांनी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

रॅलीनंतर राजकमल चौक येथे ढोल-ताशे पथकांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कला सादर केल्या. तलवारबाजीचे प्रात्यक्षिक, पारंपरिक वेशभूषा आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थित नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला. या कार्यक्रमामुळे अमरावती शहरात शिवभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button