अमरावती महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात; महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते अभिवादन

अमरावती महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस हारार्पण करून करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महापौरांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही महापौरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते चेतन गावंडे व अविनाश मार्डीकर तसेच अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. याशिवाय अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी, नगरसचिव तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिस्तबद्ध वातावरणात आणि शिवभक्तीच्या जयघोषात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



