
अमरावती : हैद्राबाद सिंद नॅशनल कॉलेजीएट युनिव्र्हसिटी, मुंबई येथे 02 ते 06 मार्च, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बुध्दीबळ (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीचा खुश दोशी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचा सुह्मद आचार्यकोडुमगुल्ला, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा वि·ोश सयाम, एस.एस.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगांवचा प्रतिक तायडे व भावनेश थेलकर, पी.आर. पोटे (पाटील) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीचा आदित्य सदाफळे, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीचा रोशन कपूर, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीचा वेदांत बक्षी आणि जे.डी. इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळचा वेदांत रागेनवार याचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे 18 ते 27 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



