AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात ह्मदयविकार व सीपीआर तंत्रावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न … डॉ. महेंद्र गुढे व डॉ. शैलेश जायदे यांनी दिले प्रशिक्षण

अमरावती (दि. 10.02.2026)-    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य विभाग व प्राणिशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ह्मदयविकार व कार्डिओपल्मोनरी रेस्क्युसिटेशन या विषयावर प्राणिशास्त्र विभागाच्या सभागृहात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, एक्झॉन हॉस्पिटलचे अस्थिरोग व ट्रॉमा तज्ज्ञ डॉ. महेंद्र गुढे, ह्मदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश जायदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमलता नांदुरकर उपस्थित होते.
                याप्रसंगी ह्मदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश जायदे यांनी प्रशिक्षण देतांना ह्मदयविकार होण्याची कारणे विषद करुन आज जगामध्ये 17.5 मिलियन लोकांचा मृत्यू होतो आहे. 2030 पर्यंत हेच प्रमाण 23 मिलियन इतके जाण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. ह्मदयविकार होण्याकरिता नेमके कुठले घटक जबाबदार आहेत, कशामुळे हार्टअटॅक येतो, हार्टअटॅक येण्याची कुठली रिस्क आहे, यावर माहिती देतांना ते म्हणाले, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, त्याचे प्रकार, तंबाखू, सिगारेट, मधुमेह, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अल्कोहोलचे अतिप्रमाणात सेवन हे रिस्क फॅक्टर असल्याचे ते म्हणाले.
                 बदललेली जीवनशैली व प्रदुषण यामुळे आज शालेय विद्याथ्र्यांमध्ये हार्टअटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते, म्हणून विद्याथ्र्यांनी अठरा वर्षानंतर आपला रक्तदाब तपासण्याची गरज आहे. तसेच तीस वर्षानंतर नियमितपणे मधुमेह तपासण्याची सुध्दा गरज आहे. ज्यांना चालतांना थोडा जरी दम लागत असेल, तर ती हार्ट अटॅकची लक्षणे असतात. त्यामुळे विद्याथ्र्यांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करावी आणि संतुलित जीवनशैली ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
                  डॉ. महेंद्र गुढे यांनी सीपीआर कसा द्यायचा, हाताची स्थिती, हाताचा दाब, सातत्याने दाब कसा द्यायचा याचे सीपीआर प्रात्याक्षिक त्यांनी दिले. यावेळी उपस्थितांकडून सुध्दा सीपीआर प्रात्यक्षिक त्यांनी करुन घेतले. सीपीआर मुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत, म्हणून सीपीआर विषयक प्रत्येकाला माहिती असण्याची आवश्यकता आहे. आज विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी सीपीआर प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांना भविष्यात सीपीआर ची गरज लागल्यास ते देवू शकतील आणि इतरांनाही माहिती देतील व रुग्णांचे प्राण वाचविण्यास अनेक हात पुढे येतील असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची दोन्हीही डॉक्टरांनी समर्पक उत्तरे दिली.
                   अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, तरुण पिढींमध्ये हार्टअटॅक येण्याचे प्रमाण आज दिसून येत आहे. हा खूप चिंतेचा विषय आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या पध्दतीने आहार सांगितला, त्याच्या विपरित आहार आपण घेत आहोत. हवेतील, पाण्यातील, अन्नधान्यातील प्रदुषण नियंत्रणाबाहेर गेले आहे. याशिवाय ·ासन विकार सुध्दा वाढत आहे, असे सांगून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले, दोन्हीही वैद्यकीय तज्ज्ञांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत ह्मदयविकार आणि त्याची कारणे, सीपीआर कसा द्यायचा याची सविस्तर माहिती आपल्याला दिली. त्यामुळे सर्वांनी फास्टफुड खाऊ नये, जास्तीतजास्त व्यायाम करावा, असेही त्यांनी सांगितले. विशेष महत्वाचे म्हणजे आपला विद्यापीठाचा परिसर हा प्रदुषणमुक्त आहे. अशाप्रकारचे आरोग्यविषयक कार्यक्रम विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यामध्ये माझा सदैव पुढाकार राहिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                     विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. हेमलता नांदुरकर यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. स्मिता थोरात यांनी करुन दिला. संचालन कु. श्रविका देवडे यांनी, तर आभार डॉ. व्ही.के. नागले यांनी मानले. कार्यक्रमाला उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, डायबेटिक असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी श्री राजेश पिदडी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. विशाल बापते तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button