Latest NewsMaharashtra PoliticsSangli

सांगलीत शिंदेंच्या आमदाराची डरकाळी! सुहास बाबरांनी भाजपचा धुव्वा उडवला; खानापुरात शिवसेनेचा ‘एकतर्फी’ विजय

सांगली: “मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार मी कोण आहे,” असं खुलं आव्हान भाजपला देणाऱ्या सुहास बाबरांनी (MLA Suhas Babar) खानापूर तालुक्यात आपला शब्द खरा करून दाखवला आहे. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (शिंदे गट) भाजपचा सुपडासाफ केला असून, खानापूर तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

खानापुरात भाजपला ‘भोपळा’ही फोडता आला नाही

खानापूर तालुक्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आमदार सुहास बाबर यांनी भाजपला चारी मुंड्या चित केले. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी मतदान झाले होते. या सर्व १२ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.

विजयी निकाल एका नजरेत:

  • जिल्हा परिषद (ZP): ४ पैकी ४ जागा (शिवसेना शिंदे गट)
  • पंचायत समिती (PS): ८ पैकी ८ जागा (शिवसेना शिंदे गट)

डॉ. शीतल बाबर यांची बाजी

नागेवाडी जिल्हा परिषद गटातून आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयानंतर खानापूर तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.

“मी कोण आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा…”

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुहास बाबर आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक उडाली होती. सुहास बाबर यांनी भाजपला ठणकावून सांगितले होते की, “माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे.” खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो, असा दावाही त्यांनी केला होता. निकालाने त्यांच्या या दाव्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्हा परिषद: एकूण पक्षनिहाय बलाबल (५३/६१ जागा)

जिल्ह्यात भाजप आणि शरद पवार गट यांच्यात चुरस पाहायला मिळाली असून, खानापूर वगळता इतर ठिकाणी भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत आहे.

पक्षजागा
भाजपा१७
राष्ट्रवादी (शरद पवार गट)१७
काँग्रेस११
शिवसेना (शिंदे गट)०६
राष्ट्रवादी (अजित पवार गट)०५
इतर (रयत क्रांती, जनसुराज्य, ठाकरे गट)०३

पंचायत समितीमधील चित्र

सांगलीतील इतर तालुक्यांमध्ये संमिश्र निकाल पाहायला मिळाले आहेत. जतमध्ये भाजपने १२ जागांसह वर्चस्व राखले आहे, तर कडेगावमध्ये काँग्रेसने (७ जागा) आपली पकड कायम ठेवली आहे. वाळवा तालुक्यात शरद पवार गटाने १४ जागांसह एकतर्फी विजय मिळवला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button